Blogs – Anupam Ayurveda

Blogs

Recent Blogs

latest-news Read More

Tips For Constipation – Piles

आजच्या कम्प्युटर युगामध्ये आपण एक मिनिटाच्या आतमध्ये जगाच्या कोणत्याही कोपर्‍यामध्ये काहीही पाहू शकतो, पाठवू शकतो, व्यवहार करू शकतो. परंतु आपल्या स्वत:च्या शरीराच्या एक कोपर्‍यामध्ये (RECTUM – मलाशय) यामध्ये काय चालू आहे हे समजून घेता येत नाही आणि समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही.

मी डॉ. शिवकुमार गोरे या लेखमाले मध्ये आज सर्वांना उपयोगी पडेल असे आयुर्वेदिक ज्ञान देत आहे. “EVERY MACHINE COMES WITH A MANUAL. ‘AYURVEDA’ IS THE MANUAL FOR A MACHINE WHAT WE KNOW AS A HUMAN BODY”

आयुर्वेद्शास्त्राने पचनसंस्थेवर इतके काही लिहून ठेवले आहे की ते इतर कुठेही मिळू शकत नाही. मुळव्याध, भगांदर, फिशर इ. आजाराचे आपण बोलताना म्हणतो की शरीरात उष्णता वाढल्याने हे आजार होतात. मग ही उष्णता येते कुठून?

आपल्या शरीरामध्ये तोंडात लाळ तयार होते. आमाशयामध्ये पित्त, insulin, पाचक रस व संपूर्ण आतडयामध्ये ज्ञात अज्ञात असे असंख्य प्रकारचे स्त्राव खाल्लेल्या अण्णामध्ये मिसळून मल / शौचाला मऊ होते. आपण कोणत्याही रंगाचे अन्न खाल्ले तरी शौचाला पिवळसरच होते. परंतु ज्यावेळी आपण ह्या स्त्रावासाठी काहीही प्रयत्न करत नाही, त्यावेळी ह्यांचे स्त्रवण (secretion) पाहिजे त्या प्रमाणात नाही झाले तर मलाशयामध्ये मऊपणा राहत नाही व माल / शौचाला हळूहळू अवेळी होणे, पूर्ण न होणे, कडक होणे असे प्रकार घडतात

समजा एखाद्याला पंचवीस हजार पगार आहे व त्यामध्ये त्याचे घर व्यवस्थित चालते. समजा त्याला पन्नास हजार जास्तीचे मिळायला लागले की मग लगेच कपडे, गाडी, सोने, फिरणे असे खर्चाचे मार्ग तयार होतात. परंतु दररोज आपल्याला जेवढी शौचाला व्हायला पाहिजे, तेवढी जर नसेल होत तर मग शिल्लक राहिलेल्या मलाला (संडासला) वेगळा मार्ग कोणताच नाही जसा की शिल्लक पैशाला आहे. मग तो मल भाग हळूहळू कोरडा व्हायला लागतो. नंतर त्यामध्ये कोरडेपणा होऊन हवा / गॅस / वात बनतो व तो शौचावाटे बाहेर पडतो. त्याकडे दुर्लक्ष झाल्यावर तो ऊर्ध्व म्हणजे उलट्या मार्गे म्हणजे मोठ्या आतडयामधून छोट्या आतडयाकडे नंतर जठराकडे व नंतर तोंडवाटे ढेकर, करपट ढेकर, आंबट ढेकर, आम्लपित्त इ. नावाने बाहेर पडतो.

नंतर आपण शौचाकडे दुर्लक्ष करून फक्त acidity आम्लपित्ताचे औषधी घेत राहतो किंवा शौचाला साफ होण्यासाठी काहीतरी जाहिराती पाहून चूर्ण / गोळ्या घेत राहतो.घरामध्ये आपल्या बेसिन मधून पाणी खाली जात नसेल तर आपण तेथेच काड्या घालत राहतो .परंतु ब्लॉक जर outlet ला असेल तर तेथे काड्या घालून काय उपयोग .

latest-news Read More

मूळव्याध आजाराचा त्रिसूत्रि उपचार ?

आजच्या कम्प्युटर युगात मानवाने अफाट प्रगती केली, अफाट ज्ञानाचे भंडार उपलब्ध झाले. गेल्या 30 ते 40 वर्षात लाइट नसल्यापासून ते लाइट, टीव्ही, टेलीफोन, मोबाइल, इंटरनेट इत्यादि वेगवेगळया क्षेत्रात आपण अद्ययावत होत चाललो आहोत. ही प्रगती अखंड चालणार आहे. पिढ्यांनपिढ्या बदलणार आहे.परंतु बदलणार नाही ती आपली पचनसंस्था व तिची घ्यावयाची काळजी. तेथे होणारे आजार व आजार पुन्हा होऊ नये म्हणून प्रतिबंधक आहार व विहार.

1-मूळव्याध झाल्यावर आग होणे, रक्त पडणे, मोड बाहेर येणे, इ.लक्षणे दिसतात. रुग्ण मग घरगुती उपचार करतो. मग शेजारी, मित्र, मेडिकल येथून औषधी घेतो. नंतर फॅमिली डॉक्टर कडून उपचार घेतो.बर्‍याच वेळा या प्रकारामध्ये शौचाची जागा PER RECTUM ,PROCTOSCOPY ,DIGITAL EXAMINATION ई. प्रकाराने कोणीही तपासत नाही. त्यामुळे शौचाच्या जागी होणार्‍या 12 आजारापैकी कोणता आजार आहे त्याचे योग्य निदान होत नाही .

बर्‍याच वेळा आजार फार थोडासाच असतो,तो थोड्याशाच औषधाने बरा सुद्धा होतो .परंतु योग्य निदानाअभावी आजार बराच होत नाही. जवळपास 70 % रूग्णाला योग्य तपासणी व योग्य उपचार वेळीच केल्यास पुढे कोणत्याही ऑपरेशन ची गरजच पडत नाही हा आमचा 20 वर्षाचा अनुभव आहे.

2. क्षारसूत्र ,क्षारकर्म, injection, ऑपरेशन —ज्यावेळी प्राथमिक अवस्थेत योग्य उपचार न केल्यास पुढील उपचाराची गरज पडते. काळानुसार संशोधन वाढत गेल्याने वेगवेगळी उपचार पद्धती येत आहे.रुग्णाणे तपासल्यानंतर आजाराच्या गरजेनुसार उपचार ठरवावा लागतो. सर्व रुग्णांना एकच उपचार लागू होत नाही.कारण तेथे PILES, FISSURE, ABSCESS, FISTULA , PILONIDAL SINUS, POLYP, CANCER, ETC. 12 प्रकारचे आजार व प्रत्येक आजारचे 3 ते 4 प्रकार असे मिळून 50 लक्षणे होतात. जर साधे मोबाइल चार्जर सुद्धा एका मोबाइलचे दुसर्‍याला चालत नाही तर 50 लक्षणाला एकच उपचार कसा चालेल.

आयुर्वेद शाश्रामध्ये 2400 वर्षापासून या सर्व आजारबद्दल सविस्तर वर्णन केलेले आहे. प्रत्येक आजारानुसार क्षारसूत्र, क्षारकर्म, प्रतिसारणीय क्षार, अग्निकर्म इ.उपचार आहेत. जर योग्य लक्षणाचा योग्य उपचार केल्यास आजार कायमस्वरूपी बारा होतो व शौचाच्या जागेचे नियंत्रण जाण्याचं धोका राहत नाही. आजार पुन्हा पुन्हा होत नाही.

3. अपुनर्भव चिकित्सा – खरोखर आयुर्वेद किती महान आहे, परंतु त्याचा योग्य उपचार करणारे व योग्य उपचार करून घेणारे ह्या दोघांची कमतरता आहे. आयुर्वेदिक उपचार करणारा वैद्य ,डॉक्टर व उपचार घेणारा रुग्ण हा समर्पित असला पाहिजे .

आयुर्वेद शास्रामध्ये कोणत्याही आजारचा उपचार झाल्यानंतर तो आजार किंवा त्या संबंधित दूसरा आजार पुन्हा होऊ नये म्हणून अपुनर्भव चिकित्सा सांगितली आहे. मूळव्याध आजारचे मूळ पचंनक्रियेशी आहे. येथे constipation हा आजार, उष्णता, पोट साफ न होणे ईत्यादीसाठी 1 ते 2 महीने औषध घेतले म्हणजे पचन संस्था निरोगी राहून पुन्हा आजार होत नाही. अशा प्रकारे मूळव्याध ई आजारचा हा त्रिसूत्रि उपचार आहे॰

latest-news Read More

मूळव्याध : गोंधळात टाकणारा आजार

आजच्या कॉम्प्युटर युगातसुद्धा गुदगत या आजाराविषयी फार समज-गैरसमज आहेत. जोपर्यंत शौचाच्या जागी काहीतरी त्रास उदा. आग होणे, रक्त पडणे, बेंड येणे, पू येणे, हाताला मांसल भाग लागणे इ. पैकी काही वाटत नाही, तोपर्यंत आपल्याला शौचाची जागा आहे, आपण तिचा जन्मापासून वापर करतोय याचे कधीच गांभीर्य नसते आणि मग वरीलपैकी त्रास झाल्यावर आपण जागे होतो आणि सुरु होतो एक न संपणारा प्रवास. कारण बोटाला थोडेसे कापले, तर आपण पटकन शेजारच्या डॉक्टरकडे जातो. मुलाला दुखायला लागले, तर आपण बालरोगतज्ज्ञाकडे जातो; परंतु शौचाच्या जागी काही त्रास झाला की मित्र, शेजारी, ओळखीचा, अक्षरश: बसमध्ये शेजारी बसलेला माणूस इ. व्यक्तींचे सल्ले घेतो. त्यापैकी कोणीही मूळव्याधतज्ज्ञ नाही, कोणालाही त्या आजाराच्या बोलीभाषेतील नावाशिवाय काहीही माहिती नाही. ती व्यक्ती रुग्णाला वेगवेगळे प्रयोग करण्यास सांगते व हेसुद्धा १००% ऐकतात का? हे कोडे मला कळालेलच नाही.

प्रत्येक जण त्याच्या आसपासच्या लोकांचे वेगवेगळे किस्से, प्रयोग इ. सांगून रुग्णाला आणखीच गोंधळात टाकतो व चालू राहतो हा न संपणारा प्रवास. मूळव्याध या आजारावर उपचार करणारे भोंदू, स्वयंघोषित वैद्य, कोणतीही वैद्यकीय पदवी नसणारे यांच्याकडे रुग्ण जातो व तीन दाहक, अॅसिड, नवसागर,चुना किंवा धागेदोरे बांधणे इ. गोष्टींचा प्रयोग होत राहतो. माझे सांगणे एवढेच आहे की, आपल्या ५०हजारांच्या गाडीचे पंक्चरसुद्धा आपण थोड्या ओळखीचा व्यक्ती पाहतो, तज्ज्ञ पाहतो, मग आपले लाखमोलाचे शरीर का कोणाच्या ताब्यात द्यायचे! आपण कोणाचेही ऐकतो. कारण ती जागा आपल्याला दिसत नाही. त्यासाठी प्रत्येक जण वेगळ्याच उपचार पद्धती सांगतो. लोकानुभव वेगळेच असतात. अशा प्रकारे मूळव्याध म्हणजे गोंधळच-गोंधळ.गोंधळून टाकणारा आजार. एक वेळेस हार्ट अटॅक माणसाला समजेल; परंतु मूळव्याध नाही. यासाठी मग कायकरावे, तर आपल्या जवळील मूळव्याध व भगंदरतज्ज्ञ डॉक्टरकडे जाये. आपली सर्व लक्षणे सांगावीत, आजाराचा काळ, सोबत इतर आजारांचे वर्णन सांगावे.

बऱ्याच वेळा ब्लड प्रेशर, हृदयरोग,मानसिक रोग, कॅन्सर इ. आजारांची औषधे हळूहळू उष्णता वाढवतात व मूळव्याध, फिशर इ. आजार उद्भवतात याचे संपूर्ण ज्ञान डॉक्टरांना असते. शौचाच्या जागी फक्त मूळव्याध न होता इतर १२ प्रकारचे आजार होतात. प्रत्येक आजाराच्या ३ ते ४ अवस्था मिळून वेगवेगळी ५० लक्षणे होतात व प्रत्येकाची उपचाराची दिशा वेगवेगळी असते. जसे आपण अगोदर पाहिले, कोणीही उपचार सांगतो म्हणजे तो फक्त न पाहता मूळव्याध या आजारावरील त्याला माहीत असलेले औषध सांगतो. त्यावर रुग्णाचा वेळ व पैसा दोन्ही खर्च होऊनही आजार बळावत जातो. म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन व्यवस्थित प्रोटोस्कोपी करून तपासणी करावी व आतील आजारांचेसुद्धा असणारे, नसणारे तपासून घेऊन त्याची उपचाराची दिशा ठरवावी. आज आयुर्वेदामध्ये मूळव्याध, भगंदर, फिशर, गुदगत ग्रंथी, विद्रधी, पिलोनिडल सायनस, अॅनल वार्टस्, गुदकंड़ बाह्यार्श इ. आजारांचे सविस्तर वर्णन केलेले आहे व त्याच्या प्रत्येक अवस्थेनुसार विनाऑपरेशन तोसुद्धा फक्त ३० मिनिटांचा उपचार शक्य आहे.

आयुर्वेदामध्ये लवकर गुण येत नाही, असा समाजामध्ये पसरलेला गैरसमज आहे; परंतु आज क्षारकर्म, क्षारसूत्र, अग्निकर्म, क्षारलेपन इ. उपचार पद्धतीमध्ये वेगवेगळे संशोधन करून रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार करून ही पद्धती तयार केली आहे. याचा फायदा म्हणजे मूळव्याध व इतर आजारांवर कोणतेही ऑपरेशन न करता, कोणताही अवयव, स्नायू न कापता कायमस्वरुपी उपचार शक्य आहे. म्हणून सामान्य जनता व इतरांनी अशी लक्षणे दिसल्यास लवकरात लवकर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासून घ्यावे व आजारामधून मुक्त व्हावे.

latest-news Read More

फिशर

 फिशर शौचाच्या जागी ओठ फाटल्यासारखी चीर पडणे, शौचानंतर भरपूर प्रमाणात आग होणे व काही काळाने बरे वाटणे. थोडेसे रक्‍त शौचाला लागून येणे किंवा थेंबथेंब पडणे इ. लक्षणे दिसतात. आज गुदगद आजारांपैकी 40 ते 50 टक्‍के रुग्ण स्त्रिया आहेतच.परंतु भीतीमुळे, लाजेमुळे स्त्रिया वर्षानुवर्ष हा त्रास सहन करतात.कालांतराने छोटासा बाहेरील बाजूस त्वचेचा भाग वाढतो,हाताला लागतो, त्यालाच  मुळव्याध  समजून त्याचीच औषधी घेतात.

मुलींना बाहेरील खाणे, स्त्रियांना शिळे खाणे, अवेळी खाणे, गरोदर स्त्रियांना गरोदरपणात किंवा बाळांतपणानंतर, पस्तिशीनंतर वेगवेगळया कारणांनी शरीरामध्ये कोरडेपणा, उष्णता वाढून, मलबध्दता होवून ओठ फाटल्याप्रमाणे चीर पडते व कोंब तयार होतो व स्त्रिया यालाच मूळव्याध समजून सहन करतात परंतू स्त्रियांनो हा फिशर असल्याने यासाठी मूळव्याध आजारावरील कोणताही औषधोपचार किंवा इतर उपचार यास उपयोगी पडत नाही. म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांकडून सर्वप्रथम याची तपासणी करुन ,निदान करुन आजाराची अवस्था माहिती करुन घ्यावी.

उपचार: औषधी-आजार नव्यानेच झाला असेल तर पोटातील औषधाने , मलमाने बरा होतो, कमी होतो.

ऑपरेशन: यामध्ये शौचाची जागा बारीक होते व तेथे स्पॅसम तयार होतो म्हणून स्पिनशिटर मसल्सला थोडया प्रमाणात कापले जाते, फिशरची गादी कापून टाके घेणे, शौचाची जागा रुंद करणे.

आयुर्वेदिकः क्षारकर्म-अग्निकर्म आयुर्वेदामध्ये झालेल्या जखमेवर विशिष्ट पध्दतीने क्षार लावून काही वेळाने ते विशिष्ट पध्दतीने तुपाने स्वच्छ करुन तेथे अग्निकर्म केले जाते. यामध्ये कोणताही नैसर्गिक स्नायू कापणे, टाके घेणे किंवा शौचावरील नियंत्रण जाणे कालांतराने असा धोका होत नाही व अग्निकर्माने उपचार केल्यावर ते आजार पुन्हा होत नाही व स्त्रियांमध्ये शौचाच्या जागेचा आकार बिघडत नाही किंवा तेथे उपचारामुळे कोणतीही खुण राहत नाही. नैसर्गिक जागा जशी आहे तशीच राहते व रुग्ण व्याधिमुक्‍्त होतो.

अपूर्णभव चिकित्सा: आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये कोणताही आजार पुन्हा उद्‌भवू नये म्हणून अपूर्णभव चिकित्सा वर्णन केलेली आहे. फिशर या आजारामध्ये शरीरातील उष्णता, कोरडेपणा कमी करणे, मलबध्दता नष्ट करणे यासाठी औषधी देवून आजारांची कारणे कायमस्वरूपी नष्ट करून रूग्णाला रोजच्या आहारातूनच उष्णता वाढू न देण्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

फिशर होवू नयेः असे वाटत असल्यास सर्व मुली, स्त्रियांनी रोज सकाळी 1 ते 2 कप दुधात 10 ग्रॅम मोठे चमचे गावरान साजूक तूप जन्मभर घ्यावे. यामुळे फिशर व्यतिरिक्‍्त इतर आजारांचे प्रमाणसुध्दा कमी होते

latest-news Read More

मूळव्याध

गुदभागी असणा-या रक्तवाहिन्या फुगून त्या ठिकाणी कोंब तयार होतात, त्याला मूळव्याध म्हणतात. गुदभागी मुळव्याधाशिवाय फिशर, भगंदर,गुदग्रंथी इ.आजारही होत आहेत परन्तु रुग्णांना त्याविषयी पुरेशी माहितो नसल्याने त्या ठिकाणी होणा-या प्रत्येक आजाराला ते मूळव्याध समजतात.

मूळव्याध का होतो?

मलबध्दता, जड आहार सेवन करणे, सतत एका जागी बसणे, सतत उभे राहणे, वारंवार मल विसर्जन करणे, सतत प्रवास, लठठपणा, आनुवंशिकता इत्यादी.

मुळव्याध आनुवंशिक असतो का?

मूळव्याध या आजारात आनुवंशिकता हे कारण काही रुग्णांमध्ये अंशतः आढळते. जन्मजात अशक्तपणा, गुदगत व्हेन्स मध्ये कपाटिका अनुपस्थित असणे, गुदभागी असलेले चसमगने जन्मतः विस्फारलेले असणे इत्यादी कारणांमुळे क्वचित प्रसंगी जन्मतःच आढळतात. परंतु एकाच कुटुंबात अनेकांना या व्याधी होण्यास कारण त्यांचे चुकीचा आहार-विहार व इतर कारणात समानता असणे ह॑ असते.

मुळव्याधाची लक्षणे काय असतात?

मलप्रवृ्तीनंतर थेब-येब किंवा रक्‍ताची चिळकांडी उडणे, रक्ताची धार लागणे, शौचाच्या वेळेस मांसल गोल आकाराचा भाग बाहेर येणे व शौचानंतर परत आत जाणे किंवा कालांतराने आत जाणे किंवा तसेच बाहेर राहणे किंवा बाहेर आलेला मांसल भाग हाताने मध्ये ढकलावा लागणे व कपडयाला रक्ताचे डाग पडणे अथवा चिकट स्त्राव लागणे.

मूळव्याध या आजारावर कोणकोणते उपचार आहेत?

मूळव्याधाचे कोंब ज्यावेळी प्राथमिक अवस्थेत असतात व रक्तस्राव  अत्यल्प असल्यास औषधी उपचार व पथ्यपालन करण्याने फरक पडतो. रक्तस्राव जास्त होत असेल किंवा कोंबाचे बाहेर येण्याचे प्रमाण वाढल्यास मूळव्याधीचा उपचार करावा लागतो.

 आधुनिक शास्त्रांमध्ये मूळव्याधीवर उपचार करण्यासाठी इंजेक्शन थेरपी, स्टेपनर लेजर, कठभ्‌ स क्रायोसरनरी इ. पध्दतीने उपचार केले जातात. यामध्ये दरवर्षी नवनवीन पध्दतीची भर पडत आहे. परंतु  प्रत्येक पध्दतीला काहीतरी मर्यादा आढळून येतात व उपचार पूर्णत यशस्वी होण्यास मर्यादा येतात.

 

आयुर्वेदशास्त्र सुमारे सहा हजार वषापूवी क्षारकर्म, क्षारसूत्र, अग्निकर्म इ. उपचाराचे सविस्तर वर्णन आहे. त्याच उपचारावर संशोधन करून मूळ तत्व न सोडता फक्त 30 मिनिटांमध्ये उपचार शक्य आहे. यामध्ये कोणतीही अवस्था व इतर हदयरोग, मधुमेह, थॉयराईड, स्त्रियांचे आजार इ. व वयाच्या 85 ते 90 वर्षे वयापर्यंत उपचार केला जातो. यामध्ये कोणताही नियंत्रण जाण्याचा धोका नाही.

ऑपरेशननंतर कंट्रोल  जातो का?

गुदमार्गाच्या ठिकाणी चीपदबजमत डनेबसम या नावाचा एक स्नायु असतो, जो शौचास नियंत्रण करतो, दुर्देवाने शस्त्रक्रिया करताना कधी कधी कट झाल्यास शौचावरचे नियंत्रण जावू शकते. आयुर्वेदिक क्षारसूत्र  उपचार करताना अशाप्रकारे नियंत्रण जाण्याची शक्यता नसते.

मुळव्याध पुन्हा-पुन्हा हा होतो ऑपरेशन फेल का जातात?

मुळव्याध उपचार, ऑपरेशन एकदा केल्यानंतरही त्याची मलबध्दतेसारखी मूळ कारणे चालू राहिल्यास काही काळानंतर पुन्हा मूळव्याधाचा त्रास होण्याची शकयता असते.

एका आजारामुळे दुसरा होतो का?

गुदभागी 12-13 वेगवेगळे आजार होतात. बरीचशी कारणे सारखीच असल्याने ब-याचदा एकापेक्षा जास्त आजार एकत्रितरित्या आढळतातय पण याचा अर्थ एका आजारामुळे दुसरा होतो असे नाही.

वेळीच उपचार न केल्यास कॅन्सर होतो का?

नाही. मुळव्याध व कॅन्सर होण्याची कारणे व पॅथॉलॉजी वेगवेगळी आहेत. त्यामुळे बराच जुना मूळव्याध असला तरी कॅन्सरची भीती नसते. याउलट मृळव्याधाचा इतिहास असतानाही एखादया रुग्णास कॅन्सर आढळू शकतो, म्हणजे काही स्वयंघोषित डॉक्टर मूळव्याध आजाराला कॅन्सरची भीती देतात.

कायमस्वरूपी उपचार आहेत का?

होय, आजाराचे निदान करुन उपचार हा डॉक्टरांनी ठरवावा व मूळव्याधीची अवस्था पाहून उपचाराचा निर्णय घ्यावा.

मूळव्याचीच्या ऑपरेशनची रुग्णांच्या मनात भीती का असते?

1985-90 पर्यंत ऑपरेशन पद्धत प्रचलित होती. त्याकाळी ऑँपरेशनंतर रुग्णांचा कंट्रोल जाण्याचे प्रकार

आढळत. त्यामुळे रुग्णांच्या मनात ऑपरेशनबद्दल भीती निर्माण झाली. त्यानंतर इतर पध्दती हळूहळू वापरात येवू लागल्या, परन्तु प्रत्येक पध्दतीमध्ये काही मर्यादा असल्याने सर्व रुग्ण त्या पद्धतीने पूर्णतः बरे होत नाहीत. पुन्हा आजार झाल्यामुळेही रुग्णांच्या मनात ऑपरेशनविषयी भिती व गैरसमज निर्माण झाले. या सर्व बाबीचा विचार करता रुग्णांचा खर्च, त्रास व वेळ वाचवण्यासाठी आयुर्वेदिक क्षारसूत्र पद्धती  मूळव्याधीवरील उपचारासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.